पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात आलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम, पाच वर्षीय एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इयत्ता बारावीचे निकाल जाहीर होऊन आता महिन्याभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, सीईटीमार्फत अनेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले नव्हते. सीईटीचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. सीईटीचा निकाल तातडीने जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काही विद्यार्थी संघटनांनी दिला होता. अखेर राज्य सीईटी सेलने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार टप्प्याटप्प्याने निकाल लावण्यास सुरुवातही झाली आहे. सीईटी सेलने एलएलबी ५ वर्षे, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Fans
Followers