पुणे पोलिसांकडून १४० पिस्तूल परवाने रद्द   

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकऱणातील आरोपी निलेश चव्हाण याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानादेखील शस्त्र परवाना मिळालाच कसा?, असा प्रश्न उपस्थित होत असून, त्याचा परवाना वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानादेखील निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी पोलीस दलातूनच मदत झाली असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे. त्यातच, पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांत तब्बल १४० पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचे समोर आले आहे.पिस्तुलाचा परवाना असलेल्या काही व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर, काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले आहेत. शहरात  काही वर्षात बंदुकीचा परवाना घेण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे अर्ज केले आहेत. स्वतःच्या सुरक्षिततेचे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला आहे. 

Related Articles