E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महापालिकांसाठी होणार नव्याने प्रभाग रचना
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच निवडणुका
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेत एकचा आणि पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापुरसह उर्वरीत राज्यातील महापालिकांमध्ये चारचा प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाकडुन देण्यात आले आहेत.या आदेशानुसार, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आधी कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका खोळंबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
या आदेशांचे पालन करताना नगरविकास विभागाने या अ, ब , क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तर ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे.महायुतीत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनयमानुसार अ, ब, क व ड वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्य प्रभाग रचना असेल.
आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचना महापालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल. ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
Related
Articles
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !