सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव   

जकार्ता : भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार कामगिरी करत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांनी डॅनिश बॅडमिंटनपटू रॅस्मस केजर पेडरसन आणि फेडरिक सॉगार्ड मोर्टेनसेन या जोडीविरुद्ध 16-21, 21-18, 22-20 असा विजय मिळविला. 
 
मात्र याचवेळी भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूला याच स्पर्धेत महिलांमध्ये पराभवाचा धक्का सोसावा लागला. तिला जागतिक क्रमांकावर 8 व्या स्थानावर असणारी थायलंडची बॅडमिंटनपटू पोर्नपावई चोकुवांग हिच्याकडून 22-20, 10-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मला आगामी स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील असे सिंधू म्हणाली. 

Related Articles