E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या विश्वासकुमार यांनी सांगितले भीषण सत्य
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामधून भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे सुखरुप बचावले. अपघातानंतर एका बाजूला आगीचे लोळ दिसताना दुसऱ्या बाजूला विश्वासकुमार विमानाच्या ढिगाऱ्यातून चालत बाहेर आले आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत बसले. जखमी अवस्थेत चालत जात असलेला त्यांचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. विमानातील २४२ लोकांपैकी ते एकटे वाचले. पण हा चमत्कार कसा घडला? विश्वासकुमार विमानाच्या बाहेर कसे पडले? याबाबत त्यांनीच माहिती दिली. डीडी न्यूजशी बोलताना आणि अपघातानंतर डॉक्टारांना दिलेल्या माहितीवरून काही बाबी समोर आल्या.
खुर्चीसकट बाहेर फेकले गेले
रुग्णालयात पोहोचल्यानंतर विश्वासकुमार रमेश यांनी डॉक्टरांना सांगितले की, विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान जिथून तुटले, तिथेच ११ए या आसनावर ते बसले होते. विमाना तुटल्यानंतर त्यांच्या सीटजवळच एक्झिट डोअर होते. त्यातून वेळीच बाहेर पडल्यामुळे विमानाला झालेल्या स्फोटातून ते वाचू शकले.
विश्वासकुमार यांनी डॉक्टरांना सांगितले की, मी विमानातून उडी मारली नव्हती. तर माझ्या सीटसह मी फेकला गेलो. “मी जिथे पडलो, ती जागा सपाट होती. मी सीट बेल्ट काढला आणि आजूबाजूला नजर टाकली. जमिनीवरच असल्यामुळे मी एक्झिट डोअरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती विश्वासकुमार यांनी डीडी न्यूजशी बोलताना दिली.
“या विमान अपघातामधून मी जिवंत कसा वाचलो, यावर माझाही विश्वास बसत नाही. काही क्षणासाठी मला वाटले होते की, मीही मरणार. पण अपघातानंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. मग मी सीटबेल्ट काढून तिथून दूर गेलो”, असेही विश्वासकुमार म्हणाले.
“विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. मी जिथे बसलो होतो, तो भाग आधीच जमिनीवर पडला. माझ्या बाजूला एक्झिट डोअर होता, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. पण माझ्या विरुद्ध बाजूला एक भिंत असल्यामुळे तिथल्या लोकांना विमानातून बाहेर पडणे शक्य झाले नसावे. मी बाहेर पडल्यानंतर विमानाचा स्फोट झाला. माझ्या नजरेसमोरच दोन एअर होस्टेस आणि एक वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला होता”, अशी माहिती विश्वासकुमार रमेश यांनी दिली.
कोण आहेत विश्वासकुमार रमेश?
३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते आपल्या भावासह दीव येथे आले होते. अहमदाबादहून ते आपल्या भावाबरोबर परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI 171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांचा भाऊ मात्र अपघातात वाचू शकला नाही. गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहत आहेत.
Related
Articles
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
03 Jul 2025
अबब! पालिकेचा हार, फुले, नारळांवर ७० लाख खर्च
29 Jun 2025
पाथमू निसंकाचे शानदार शतक
27 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
03 Jul 2025
अबब! पालिकेचा हार, फुले, नारळांवर ७० लाख खर्च
29 Jun 2025
पाथमू निसंकाचे शानदार शतक
27 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
03 Jul 2025
अबब! पालिकेचा हार, फुले, नारळांवर ७० लाख खर्च
29 Jun 2025
पाथमू निसंकाचे शानदार शतक
27 Jun 2025
अकरावी प्रवेशाची पहिली बहुप्रतिक्षित यादी जाहीर
29 Jun 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
03 Jul 2025
अबब! पालिकेचा हार, फुले, नारळांवर ७० लाख खर्च
29 Jun 2025
पाथमू निसंकाचे शानदार शतक
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप