पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वायव्येकडील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी जिल्ह्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी १४ बंडखोरांना ठार  केले. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंडखोरांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील दत्ता खेल या सामान्य भागात शोधमोहीम राबवली. एका घरात लपून बसलेल्या बंडखोरांना शरण येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यावेळी पाकिस्तान लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात १४ बंडखोर ठार झाले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी देशातून पुरस्कृत बंडखोरांचा धोका पुसून टाकण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.मे महिन्यात, पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांमध्ये आणि कारवायांमध्ये ७० संशयित बंडखोर, ५० नागरिक आणि ५७ सुरक्षा कर्मचारी असे १७७ जण मारले गेले.

Related Articles