आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई   

गुवाहाटी : लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी मंगळवारी आसाम काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे गोगोई यांच्याकडे पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे. मागील तीन वर्षांपासून आसामच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी भूपेन कुमार बोरा सांभाळत होते. प्रदेश मुख्यालयात बोरा यांच्याकडून गोगोई यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. गोगोई यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाख्या मंदिराला भेट दिली. गेल्या आठवड्यात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने गोगोई यांच्याकडे आसामची सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. 

Related Articles