प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल   

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना रविवारी रात्री गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयातील गॅस्ट्रो विभागात ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहेत.
 
 हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना सिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल महाविद्यालयात नेण्यात आले होते. चार-पाच वर्षांत सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास देखील आहे. २०२२ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.
 

Related Articles