मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका   

कमल हासन यांना न्यायालयाने झाडले

बंगळुरू : तुम्ही कमल हासन असा किंवा नसो पण तुम्हाला नागरिकांच्या संवेदनांना धक्का पोहोचविण्याचा कोणताही अधिकार नाही,  भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालणार नाही. सार्वजनिक जीवनात वावरत असल्यामुळे समाजाच्या संवेदनांना धक्का पोहाचविण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुमचे वक्तव्य म्हणजे एखाद्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लावून मधमाशांना डिवचण्यासारखेच आहे. अशामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. याचे भान ठेवा, अशा कडक शब्दांत कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी हासन यांचे कान  उपटले.
 
 कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला, असे वादग्रस्त वक्तव्य नुकतेच त्यांनी केले होते. त्यामुळे हासन यांचा ठग लाइफ चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडून घेण्यात आला होता. त्याविरोधात हासन यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायाधीश एम. नागप्रसन्ना यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा हासन यांची खरडपट्टी केली.. कळकळीची माफी मागून प्रकरण संपविता आले असते, असे निरीक्षणही नोंदविले. 

न्यायालयाच्या कानपिचक्या

समुदायाच्या संवेदनांना धक्का पोहोचविण्याचा अधिकार नाही
सार्वजनिक जीवनात वादग्रस्त विधाने टाळा
तुम्ही इतिहासतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आहात का ?
विधानाला काही आधार आहे का ?
चित्रपट प्रदर्शनाला संरक्षण हवे तर, आधी माफी मागा
दिग्दर्शक मणिरत्नम आहेत, मग वक्तव्य का केले
विधान करुन वर पोलिस संरक्षण कसले मागता ?
समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया पाहा
भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या संवेदनांना धक्का पोहाचविण्याचा अधिकार तुम्हाला नाही
उचलली जीभ लाव टाळ्याला चालणार नाही
सार्वजनिक जीवनात जिभेला लगाम घाला
 

Related Articles