E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
रिकाम्या पाण्याच्या बाटल्या; सडलेल्या फळांचा खच
सासवड, (वार्ताहर) : सासवड शहरातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग लगतच्या व सासवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे एसटी महामंडळाचे सासवड एसटी स्थानक हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे. या बस स्थानक व आगारात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला असून कचर्याचे सगळीकडे साम्राज्य आहे.
सासवड बस स्थानकातील आंब्याच्या फळांच्या झाडाचे खाली पडलेले आंबे सडले असून, या सडलेल्या आंब्यांची संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधी युक्त कचर्यामुळे सर्वत्र माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सासवड एसटी आगार परिसरात स्वच्छता व झाडलोट केली जात नाही. विशेष म्हणजे बस स्थानकाचे आगार प्रमुख सागर गाडे यांच्या कार्यालयाच्या अगदी समोर हा सर्व दुर्गंधीयुक्त कचरा पडलेला असूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सासवडचे बस स्थानक हे पुरंदर तालुक्यातील मुख्य बस स्थानक आहे. रोज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी हे एसटीने प्रवास करत असतात ग्रामीण भागातील हेच हजारो प्रवासी या बस स्थानकात रोज येजा करतात त्याच प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे स्वच्छ भारत अभियान सुरू असताना एसटी महामंडळाच्या सासवड बस स्थानकात मात्र भारत स्वच्छता अभियानास हरताळ फासण्याचेच काम सुरू असल्याचे दिसत आहे. अशा पद्धतीने बस स्थानकातील दुर्गंधीयुक्त कचरा हे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करणारा आहे. विशेष म्हणजे याबाबतीत आगार प्रमुख सागर गाडे यांना विचारले असता थातूरमातूर कारण देत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. टोलवाटोलवी करत या कचरा व अस्वच्छतेबाबत कारण देताना त्यांनी सासवड नगरपरिषदेवरच जबाबदारी ढकलली. सासवड नगरपरिषदेची कचरा गाडी वेळेवर येत नाही, असे कारण पुढे केले. हा सर्व परिसर हा एसटी महामंडळाचा असून आगार प्रमुखांची ही जबाबदारी आहे, की त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणे सासवड नगर परिषदेने हे स्वच्छ करावे ही अपेक्षा करणे म्हणजे आपल्या घरातील कचरा हा शेजार्याने स्वच्छ करावा असेच म्हणल्या सारखे आहे. या कचर्यामुळे नागरिक आणि प्रवासी या कचर्याने त्रस्त आहेत.
सासवड बस स्थानकत तीन स्वच्छता कर्मचारी नियुक्त आहे. कर्मचार्यांचा अभाव असल्यामुळे सासवड आगारात कचरा साचलेला आहे.
- सागर गाडे, आगार प्रमुख, सासवड बस स्थानक
Related
Articles
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण
12 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात