पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या   

इस्लामाबाद : पाच लाखांवर फॉलोअर असलेल्या पाकिस्तानातील अल्पवयीन टिक टॉकर सना युसूफ हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.राजधानी इस्लामाबाद येथील जी १३ विभागातील तिच्या राहत्या घरी अनोळखी व्यक्तीने तिच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार केला होता. मारेकरी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिच्या घरात शिरला आाणि त्याने अनेक गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत तिला पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल केले. त्यापूर्वीचा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मारेकरी पाहुणा म्हणून घरात घुसला असावा आणि नंतर त्याने निर्दयीपणे गोळ्या झाडून तिचा खून केला असावा, असा कयास सुंभाळ पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला. 

Related Articles