काश्मीरमध्ये तीन सरकारी कर्मचार्‍यांची हकालपट्टी   

पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध

जम्मू : लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनांशी लागेबांधे आणि संबंध असल्याच्या संशयावरुन तीन सरकारी कर्मचार्‍यांची हकालपट्टी मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या साहाय्यकाचा समावेश आहे. 
 
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तिघांची काल पदावरुन हकालपट्टी केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल मलिक इशाक नासीर, शिक्षक अझिज अहमद अणि  श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा साहाय्यक वसिम अहमद खान, अशी त्यांची नावे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा हितासंदर्भातील राज्यघटनेच्या ३११(२)(क) अन्वये त्यांची हकालपट्टी केली. आतापर्यंत दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्या प्रकरणी ७५ सरकारी कर्मचार्‍यांची हकालपट्टी झाली आहे.  तिघेही जण दहशतवाद्यांसोबत कार्यरत आणि संपर्कात होते. शस्त्रास्त्रांचा  चोरटा व्यापार करत होते. त्यासाठी वाहन पुरवले होते. त्याद्वारे सुरक्षा दल, नागरिकांना धोका निर्माण केला होता. 
 

Related Articles