E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
सासवड
, (वार्ताहर) : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विरोध हा अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. विमानतळ विरोधातील आंदोलकांनी पुरंदर विमानतळ बाधित सात गावातील शेतकर्यांनी सोमवारी सासवड शहरातील मुख्य चौकात हातात फलक घेत उभे राहत पोस्टर आंदोलन केले.
सासवड शहरातील प्रत्येक चौकात विमानतळ बाधित गावातील शेतकरी, महिला नागरिक हातात विमानतळ विरोधातील मजकूर लिहिलेले फलक घेऊन उभे होते. या आंदोलकांच्या पोस्टर आंदोलनाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे, ज्या ज्या चौकामध्ये हे आंदोलक हातात फलक घेऊन उभे होते त्या ठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालक, नागरिक थांबून हे फलक वाचत होते. फलक हातात घेणार्या आंदोलकांशी याबाबतीत विचारपूस करत होते.
पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलकांनी एक अभिनव असे आंदोलन सासवड शहरात केले. विमानतळ बाधितांच्या या पोस्टर आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. विमानतळ बाधित जे आंदोलन या पोस्टर आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात १३ जून पर्यंत कलम १४४ लागू असून जमावबंदीचे आदेश आहे, त्यामुळे पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही. या आदेशामुळे विमानतळ विरोधात आंदोलन करण्यास मर्यादा येत आहे. प्रशासनाने विमानतळ विरोधातील आंदोलने दडपण्यासाठीच ही जमावबंदी पुणे जिल्ह्यात लागू केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
पुरंदर विमानतळाला वाढता विरोध लक्षात घेता हा विरोध व आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठीच प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमालबंदीचे आदेश दिल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.एकंदरीतच आंदोलनकर्त्यांच्या या पोस्टर आंदोलनामुळे एक प्रकारे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या जमावबंदीच्या आदेशाच्या विरोधात गनिमी कावा करून विमानतळ विरोधातील आंदोलन पेटते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
एक एकटे हातात फलक घेऊन उभे असणारे आंदोलक हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलकांच्या पोस्टरवर गाव वाचवा, जमीन वाचवा, विमानतळ नकोच, राजकारण नको विमानतळ नको फसवा विकास नको, जात पक्ष गट बाजूला ठेवून आमचा एकच धर्म शेतकरी जमीन वाचवा तालुका वाचवा, पुरंदर अदानी विमानतळास शंभर टक्के विरोध, पुरंदर अदानी विमानतळ शेतकर्यांवर लादणे म्हणजे लोकशाहीची हत्या होय, ’संविधान वाचवा शेतकरी वाचवा निसर्ग वाचवा’ अशा घोषणांचे फलक हातात घेऊन आंदोलकांनी सासवड शहरात पोस्टर आंदोलन केले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक