भंडार्‍यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू   

भंडारा : भात पिकाची कापणी करताना वीज अंगावर कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडार्‍याच्या खांबडी शेतशिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे भंडार्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कांता जीभकाटे (वय ५५) आणि विजय सिंग (४०) अशी मृतांची, तर संजय गाडेकर (४७) आणि महेश तेजासिंग (३०) अशी जखमींची नावे आहेत. 

Related Articles