E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
Wrutuja pandharpure
30 May 2025
स्टावन्गर
: नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील तिसर्या दिवशी भारताच्या जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने अमेरीकेच्या हिकारू नाकामुरा याला तिसर्या फेरीत हरवत या स्पर्धेत जबदस्त पुनरागमन केले. हा सामना भारताच्या गुकेश याने ४२ चालींनंतर जिंकला. हा सामना खेळताना गुकेश हा तणावाखाली दिसत होता. त्याला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे आता गुकेशचे या स्पर्धेत ३ गुण झाले आहेत. तर अमेरीकेचा फाबियानो कारूना याने ६ गुण मिळविले. त्याने अर्जुन एरेगसी याचा पराभव केला. त्यामुळे अर्जुन एरेगसी याला ४.५ गुण मिळाले आहेत. तर नॉर्वेचा मॅगनस कार्लसन हा चीनच्या वे यी याच्याविरुद्ध पराभूत झाला. त्यामुळे कार्लसनचे ५ गुण झाले आहेत. तर चीनचा वे यी याचे २.५ गुण आहेत.
तर याआधी दुसर्या दिवशी भारताच्या जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशला संघ सहकारी अर्जुन एरिगेसीकडूनच पराभव पत्करावा लागला होता. स्पर्धेत सलग दुसर्या डावात गुकेशवर पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्याचवेळी हिकारू नाकामुराने आर्मागेडॉन डावात मॅग्नस कार्लसनला हरवले होते.सहा खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गुकेशकडे संभाव्य विजेता म्हणून बघितले जात आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला भारताचाच अर्जुन एरिगेसी आणि अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा ४.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
गुकेश आणि अर्जुन या भारतीयांमधील लढतीत कमालीचा संघर्ष बघायला मिळाला. पांढर्या मोहर्यांसह खेळणार्या अर्जुनने सुरुवातीला चांगली आघाडी घेतली होती. मात्र, गुकेशने बचाव भक्कम ठेवत पटावर संमिश्र स्थिती निर्माण केली होती. ही लढत वेळेच्या बंधनात अडकणार हे स्पष्ट होते. अशा संघर्षपूर्ण स्थितीत चार तासांपेक्षा अधिक चाललेल्या डावात अखेर अर्जुनने बाजी मारली.
या वर्षाच्या सुरुवातीलाही २१ वर्षीय अर्जुनने टाटा स्टिल बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा पराभव केला होता. गुकेश त्यावेळी विजेतेपदाच्या उंबरठ्यावर होता. मात्र, या एका पराभवाने गुकेशला विजेतेपदापासून दूर जावे लागले होते. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार्या एरिगेसीने गुकेशला ६२व्या चालीत पराभव मान्य करण्यास भाग पाडले.
दरम्यान, कार्लसन आणि नाकामुरा या खेळाडूंमधील बहुप्रतीक्षित लढत अपेक्षेप्रमाणे शांत पद्धतीने झाली. या सुरुवातीवर कार्लसन समाधानी होता. दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांनी संपूर्ण डावात अचूकता जराही सोडली नाही. त्यामुळे डाव अनिर्णित राहिला. यानंतर झालेल्या आर्मागेडॉन डावात कार्लसनने सुरुवातीपासून कमालीचा आक्रमक खेळ करुन पटावरील स्थितीवर नियंत्रण असल्याचे दाखवून दिले.
कोनेरू हंपी अव्वल
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील तिसर्या दिवशी भारताच्या कोनेरू हंपी हिने महिलांच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान पटकाविले. तिने पांढर्या मोहर्यांसह युक्रेनच्या अॅना मुझयाचुक हिला पराभूत केले. त्याआधी तिने इराणी महिला बुद्धीबळपटू सरसादत खादेम हिला देखील तिसर्या फेरीत पराभूत केले होते. त्यामुळे कोनेरू हंपी सध्या ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर पराभूत झालेली प्रतिस्पर्धी खेळाडू सरसादत खादेम हिला २ गुण मिळाले आहेत. तर चीनची बुद्धीबळपटू जु वेनजुन हिला ४ गुण मिळाले आहेत. तिने भारताची बुद्धीबळपटू आर वैशाली हिला पराभूत केले. भारताची आर वैशाली हिला २ गुण मिळाले आहेत.
Related
Articles
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !