सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत   

सिंगापूर : खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उप उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. त्यांनी इंडोनिशियाच्या साबर कार्यमन गुटामा आणि मोह रजा पहलेवी यांच्या जोडीला २१-१९,२१-१६,२१-१९ असे हरविले. हा सामना भारताच्या बॅडमिंटनपटूंनी १ तास १४ मीनिटात जिंकला. आता आगामी सामन्यात त्यांना मलेशियाच्या बॅडमिंटनपटूं विरुदध खेळायचे आहे. 
 
तर दुसरीकडे सिंधूला चीनची बॅडमिंटनपटू चेन युफी हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तिने सिंधूला २१-९, २१-१८,२१-१६ असे अवघ्या ६५ मीनिटात पराभूत केले. या सामन्यात सिंधू दुसर्‍या गेममध्ये १९-१२ अशी मागे पडली. त्यानंतर तिने २१-१८ असा गेम गमावला. त्यानंतर सिंधूने हा सामना जिंकण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला. 

Related Articles