बोटाच्या दुखापतीमुळे चहल सलग दुसर्‍या सामन्यातून बाहेर   

प्ले-ऑफमध्ये खेळणार

नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा मुख्य फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सोमवारी बोटाच्या दुखापतीमुळे सलग दुसर्‍या आयपीएल सामन्यात खेळू शकला नाही परंतु तो सर्व महत्त्वाच्या प्ले-ऑफसाठी पूर्णपणे फिट होण्याची अपेक्षा आहे.पंजाब किंग्जने चहलच्या सेवेसाठी १८ कोटी रुपये दिले होते, ज्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यासाठी लेग-ब्रेक गोलंदाज पुरेसा तंदुरुस्त नव्हता. शनिवारी तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता.

Related Articles