पहलगामच्या पर्यटक महिलांनी दहशतवाद्यांशी लढा द्यायला हवा होता...   

भाजप खासदाराने उधळली मुक्ताफळे

नवी दिल्ली  पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी पर्यटक महिलांनी लढा द्यायला हवा होता, अशी मुक्ताफळे भाजपचे मध्य प्रदेशातील खासदार राम चंदर जांगडा यांनी उधळली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि जांगरा यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने रविवारी केली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भजपचे नेतृत्वाने जांगरा यांच्या विधानावर मौन पाळले आहे. ही बाब त्यांचे एक प्रकारे समर्थन असलयाचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. भाजप नेते वादग्रस्त विधाने करुन एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. तसेच  पहलगाम हल्ल्यातील बाधित आणि सैन्य दलांची एक प्रकारे चेष्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासदार जांगडा यांचे विधान लज्जास्पद असून त्यातून संघ आणि भाजपची मानसिकता उघड होत आहे, अशी टीका खर्गे यांनी एक्सवर पोस्ट टाकून केली. 

Related Articles