आसाममध्ये उल्फाचा म्होरक्या पकडला   

दिब्रुगड : बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा-आय) दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक करण्यात आली.  रुपम असोम, असे त्याचे नाव आहे.  आसाम आणि अरुणाचल प्रदेश सीमेवरील जंगलात आसाम रायफल्स आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करुन त्याला अटक  केली. रुपमकडून शस्त्रे आणि शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. राज्यातील अनेक भागांत तो खंडणी वसूल करत होता. बोर्डमुसा पोलिस ठाण्याचे अधिकारी भास्कर कालतीया यांची त्याने २०१८ मध्ये हत्या केली होती. या  प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले होते. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर रुपम आणि त्यांच्या सहकार्‍यांचा वावर होता. ते पूर्व आसामच्या जंगलात लपल्याचा सुगावा पोलिसांना लागला. यानंतर शुक्रवारी मोहीम राबविली होती. रात्री त्याला पकडण्यात आले. आता त्याच्या सहकार्र्‍यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

Related Articles