E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवासी बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीराची सांगता
Wrutuja pandharpure
21 May 2025
वडगाव मावळ
: मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे ४ ते १८ मे या कालावधीत निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीर पार पडले. रविवारी दत्तात्रय महाराज हजारे यांच्या कीर्तन सेवेने शिबिराची सांगता झाली. १५ दिवसांच्या शिबिरात श्लोक, स्तोत्र, अभंगाचे पठण, गीता पाठ, टाळ व पखवाज वादन, हरिपाठ, योगा, मैदानी खेळ असे उपक्रम तसेच तालुक्यातील जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकार यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.यावर्षी शिबिरात ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रमेशसिंहजी व्यास हे होते.
या कार्यक्रमासाठी भामचंद्र डोंगर निवासी शंकर महाराज मराठे,खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अंकुशराव आंबेकर, देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकन बाफना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, कान्हे गावचे सरपंच विजय सातकर,सरपंच योगिता कोकरे, दिंडी समाजाचे अध्यक्ष महादूबुवा सातकर, उमेश शिंदे, मारूती आगळमे, संकेत शिंदे, राजाराम शिंदे, सुवर्णा कुंभार, संतोष बोडके, संपत कदम आदी उपस्थित होते. सकाळी ९ ते ११ या वेळेत दत्तात्रय महाराज हजारे यांची किर्तनरूपी सेवा झली. त्यानंतर श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. शंकर महाराज मराठे यांनी शुभाशिर्वाद दिले.
यावेळी मुलांनी शिबीरात प्राप्त केलेल्या कलागुणांचे प्रदर्शन झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या वतीने शिबीरातील विद्यार्थ्यांना विविध आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांनी केले. त्यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे महाराज यांनी मंडळाकडून लवकरात लवकर मावळ तालुक्यामध्ये भव्य वारकरी भवन बांधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी मावळातील प्रत्येक गावागावातून व प्रत्येक घरातून मंडळाच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा मानस यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे महाराज यांनी व्यक्त केला.
आभार गोपिचंद महाराज कचरे यांनी मानले सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे यांनी केले मंडळाच्या वतीेने श्री.साईबाबा सेवाधाम येथे विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व प्रशिक्षणाची सोय केलेली होती. विद्यार्थ्यांना दत्तात्रय महाराज हजारे, गोपिचंद महाराज कचरे, सोमनाथ महाराज सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
Related
Articles
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
पुण्यात पावसाची विश्रांती
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
पुण्यात पावसाची विश्रांती
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
पुण्यात पावसाची विश्रांती
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
पुण्यात पावसाची विश्रांती
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात