विधानभवनातील स्कॅनिंग मशिनला लागली आग   

मुंबई : राज्य विधानसभा संकुलातील प्रवेशद्वाराजवळचे एका स्कॅनिंग मशिनला सोमवारी अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट उसळले होते. अचानक आग कशी लागली ? असे प्रश्न परिसरातून विचारले जात होते.  दरम्यान, दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. 
  
काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराबाहेरील स्कॅनिंग मशिनला आग लागली होती. नागरी अधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी तातडीने आग नियंत्रणात आणली. दरम्यान, अग्शिशमन दलाचे दोन बंब आणि अन्य वाहनांंना घटनास्थळी बोलावले होत.. गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचल्या आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.
 
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, विधान भवनाच्या बाहेरील केबिनमध्ये छोटी आग लागली होती. स्कॅनिंग मशिनला आग शॉटंंर्ंसर्किटने लागली असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आता परिस्थिती पूर्ण नियत्रंणात आहे. आग लागल्यानंतर धोक्याचा इशारा देणारे भाेंंगे परिसरात वाजले नव्हते. हा केवळ अपघात आहे. विधानभवन संकुल सुरक्षेने वेढले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही एक कारण नाही. तसेच विधानभवनात कोणताही तांत्रिक बिघाडही झालेला नाही. सर्व कर्मचारी सुरक्षित असून अनुचित घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्नि सुरक्षेसंदर्भातील सर्व शिष्टाचार पाळले जात आहेत. 

Related Articles