E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
चीनची जबरदस्त निर्यात
Wrutuja pandharpure
18 May 2025
अर्थनगरीतून,महेश देशपांडे
अमेरिकेने प्रत्युत्तर शुल्क लादले असले तरी चीनने निर्यातीत जबरदस्त वाढ नोंदवली आहे. भारतात म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’ द्वारे विक्रमी गुंतवणूक झाली. याखेरीज ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानला ऐंशी हजार कोटींचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
अमेरिकेच्या शुल्कवाढीचा परिणाम न होता, चीनची निर्यात एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढली. अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षाही ती जास्त आहे. तथापि, चीनची अमेरिकेला होणारी निर्यात २० टक्क्यांनी कमी झाली आहे. अर्थतज्ज्ञांनी एप्रिलमध्ये चीनची जागतिक निर्यात दोन टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला होता; मात्र समोर आलेल्या ताज्या आकडेवारीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्र्त्री स्कॉट बेसंट आणि इतर वरिष्ठ अमेरिकन अधिकारी चीनचे सर्वोच्च व्यापार दूत हे लाइफेंग यांना भेटणार असताना हे आकडे जाहीर करण्यात आले. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था संघर्षाच्या पातळीवर असून त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. काही दंडात्मक शुल्क मागे घेण्याबाबत एकमत झाले तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्याची फारशी आशा नाही. येत्या काही महिन्यांमध्ये टॅरिफमुळे चीनची अमेरिकेला होणारी निर्यात आणखी कमी होऊ शकते, असे मानले जात आहे.
अमेरिकेची चीनसोबतची व्यापारी तूट २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ती सुमारे २७ अब्ज डॉलर होती. आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये चीनची अमेरिकेला होणारी निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय, अमेरिकेतून होणारी चीनची आयातही ४.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते चीन जागतिक निर्यातीद्वारे अमेरिकेला होणार्या निर्यातीची भरपाई करू शकतो. वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये आग्नेय आशियाई देशांना चीनची निर्यात ११.५ टक्क्यांनी वाढली. याशिवाय, दक्षिण अमेरिकन देशांना होणार्या साखर निर्यातीतही ११ टक्क्यांनी वाढ झाली. भारतात पाठवल्या जाणार्या वस्तूंमध्येही १६ टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय आफ्रिकेतील निर्यातीतही वाढ झाली.
‘एस आय पी’ ला पसंती
‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे गुंतवणुकीने एक नवा विक्रम नोंदवलला आहे.इ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडिया’ (एएमएफआय) च्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये ’एस आयपी द्वारे’ म्युच्युअल फंडांमध्ये २६,६३२ कोटी रुपयांचा निधी आला.े सुमारे ८.३८ कोटी गुंतवणूकदारांनी यात भाग घेतला. याचा अर्थ भारतीय आता ‘एसआयपी’द्वारे पैसे गुंतवण्यात रस दाखवू लागले आहेत. परंतु ‘इक्विटी फंडां’मध्ये सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. एप्रिलमध्ये इक्विटी योजनांमध्ये येणारा निधी २४,२६९ कोटी रुपयांवर घसरला. तो गेल्या बारा महिन्यांमधील सर्वात कमी आहे.
‘स्मॉल-कॅप’ योजनांमध्ये येणारा निधी २.३ टक्क्यांनी घसरून ३,९९९ कोटी रुपयांवर आला. याशिवाय, ‘मिड-कॅप’ योजनांमध्ये ३.६ टक्क्यांनी घट झाली, तर ‘लार्ज-कॅप फंडां’मध्ये २,६७१ कोटी रुपयांची वाढ झाली. त्याच वेळी क्षेत्रीय आणि विषयगत निधींमधील गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आणि ती २,००१ कोटी रुपयांवर पोहोचली. ही वाढ कोणत्याही नवीन ‘एनएफओ’ (नवीन फंड ऑफर) मुळे नाही, तर गुंतवणूकदारांच्या
हितामुळे झाली आहे.
एप्रिलमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधून किरकोळ गुंतवणूक ५.८२ कोटी रुपये झाली. सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केला असे मानले जाते. त्याच वेळी, हायब्रिड फंडांमध्ये, विशेषतः आर्बिट्रेज योजनांमध्ये अकरा हजार कोटी रुपयांचा ओघ आला आहे, म्हणजेच तिथे लोक तात्पुरते पैसे गुंतवत आहेत आणि भविष्यासाठी नियोजन करत आहेत. ‘एएमएफआय’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, एप्रिलमध्ये निव्वळ गुंतवणूक ३.२ टक्क्यांनी कमी झाली असली, तरी ‘इक्विटी एयूएम’ (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) चार टक्क्यांनी वाढली.
पाकिस्तानला आर्थिक दणका
‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे पाकिस्तानला जबरदस्त तडाखा बसला. युद्धविरामाला दोन्ही देशांनी मान्यता दिली. कंगाल पाकिस्तानचे केवळ शेअर बाजारातूनच ऐंशी हजार कोटींहून अधिकचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या अनेक शहरांमधील धावपट्टया, विमान, ड्रोन, क्षेपणास्त्रे नष्ट झाले आहेत. त्यांचे लाडके दहशतवादी मारले गेले आहेत. हे नुकसान अपरिमीत आहे. पाकिस्तान आता किती नुकसान झाले याची मोजदाद करत आहे. याविषयीचा अधिकृत आकडा पाकिस्तान सांगेल का, हा पण प्रश्न आहे.
पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. एअरस्पेस आणि विमानतळ बंद राहिल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती एकदम मंदावली. एका अंदाजानुसार या सर्व कारवाईमध्ये पाकिस्तानचे अनेक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकसान झाल्याचे कबूल केले आहे. अधिकृत आकडेवारी समोर आली नसली नाही; पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली इतके नक्की. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर कराची स्टॉक एक्सचेंजला तीन दिवसांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले. जागतिक नाणेनिधीच्या मदती’मुळे या शेअर बाजारात तेजी दिसून आली, मात्र त्यानंतर एकूणच बाजार तीन दिवसात जवळपास सहा हजार चारशे अंकांनी पडला. दोन दिवसांमध्ये कराची स्टॉक एक्सचेंज सुमारे दहा हजार अंकांनी खाली गेले.
बँक ऑफ बडोदाच्या संशोधन अहवालानुसार एप्रिल २०२५ चा किरकोळ महागाई दर तीन टक्क्यांपेक्षा कमी राहू शकतो. अहवालात म्हटले आहे की अलिकडच्या आठवड्यात अन्नपदार्थांच्या किमती, विशेषतः भाज्यांच्या किमती ३४ टक्क्यांनी तर डाळींच्या किमती १५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती, विशेषतः सूर्यफूल तेलाच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी निर्देशांकात त्याचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याने महागाईवाढीवर मर्यादित परिणाम होईल. अहवालानुसार, जूनच्या बैठकीत रिझर्व बँक रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांपेक्षा जास्त कपात करू शकते. यामुळे कर्ज अ स्वस्त होण्याची आशा वाढली आहे.
टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांसारख्या आवश्यक अन्नपदार्थांचे उत्पादन करणार्या राज्यांमध्ये तपमानात घट झाल्यामुळे पीक उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे किंमती आणखी कमी होऊ शकतात. मार्चमध्ये महागाई वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर होता. मार्चमध्ये किरकोळ महागाई वाढीचा दर ३.३४ टक्क्यांपर्यंत घसरला. महागाई वाढीच्या दरात अन्नपदार्थांचा वाटा जवळपास ५० टक्के आहे. महिना-दर-महिना आधारावर महागाई दर ३.७५ टक्क्यांवरून २.६७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्याच वेळी ग्रामीण महागाई ३.७९ टक्क्यांवरून ३.२५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे तर शहरी महागाई ३.३२ टक्क्यांवरून ३.४३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
Related
Articles
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?