तुर्कीच्या विमान कंपनीचे भारत कापणार पंख   

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संंघर्षावेळी पाकिस्तानला ड्रोन देणार्‍या तुर्कीला आता भारत सरकार दणका देणार आहे. त्या अंतर्गत दोन भारतीय विमान कंपन्यांसोबत भागीदारी करुन पैसा लाटणार्‍या तुर्कीच्या विमान कंपनीला तडाखा देण्याचा विचार सरकारने केला आहे. 
 
भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यावेळी तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली होती. त्यामुळे पाकिस्तानसोबतच आता तुर्कीस्तानविरोधात देखील भारतात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तुर्कीविरोधात भारताने आक्रमक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतात तुर्कस्तानी एअरलाइन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणार्‍या कंपनीसोबतचे भारतातील करार रद्द करण्यात आले होते. 

Related Articles