दिल्लीत १३ बांगलादेशी नागरिकांना अटक   

नवी दिल्ली : दिल्लीत बेकायदा वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांसह ५ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मोहम्मद रफीकुल (५०), खोतेजा बेगम (४१), मोहम्मद अनावर हुसेन (३७), मोहम्मद अमीनुल इस्लाम (२८), झोरिना बेगम (२७), अफरोजा खातून (२५), मोहम्मद खाखोन (२०), हसना (१९) आणि पाच अल्पवयीन मुले बांगलादेशातील खुदीग्राम येथील रहिवासी आहेत. दिल्लीच्या बाहेरील औचंडी गावातून त्यांना एका कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांनी भारतात राहण्यासाठी कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे कबूल केले. त्यांनी दोन वर्षांपूर्वी झलील अहमद नावाच्या बांगलादेशी एजंटच्या मदतीने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून बांगलादेशी ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Related Articles