रायपूर : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणार्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक केली. पन्ना बीबी (वय २५) असे या महिलेचे नाव असून, ती अंजली सिंग उर्फ काकोली घोष या बनावट नावाने जिल्ह्यातील सुपेला पोलिस ठाण्याच्या परिसरात सूरज साव यांच्या घरात राहत होती. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून महिलेला ताब्यात घेतले. तिने अंजली सिंग नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले होते. त्यावर पूर्व दिल्लीतील नांगलोईची रहिवासी असल्याचे दाखविण्यात आले होते. ती दोन वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करत होती.
Fans
Followers