E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अवकाळी पावसाने झोडपले
Wrutuja pandharpure
14 May 2025
कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता परिसरात धुव्वाधार
पुणे
: ढगांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी शहराला झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे विविध प्रकारच्या बाजारपेठेवर या पावसाचा परिणाम झाला. अवकाळी पावसामुळे उकाडा दूर झाला असून हवेतील गारव्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला.
कोथरूड, शिवाजीनगर, वारजे, सिंहगड रस्त्यासह मुळशी आणि मावळ तालुक्यातील काही भागात जोरदार बरसला. मुळशी तालुक्यातील लवळे येथे सर्वाधिक ४९ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील शिवाजीनगर परिसरात १९ मिमी पाऊस झाला. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्याला यलो अलर्ट दिला आहे.
शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तपमानात लक्षणीय घट झाली आहे. मागील आठ दिवसांत ४० अंशावरील कमाल तपमान ३४ अंशापर्यंत घसरलेे आहे. बहुतांश भागात दुपारनंतर पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रात्री हवेत गारवा वाढला आहे. काल सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागास कोथरूड, वारजे, धायरी, कात्रज, पाषाण आणि औंध परिसरात पावसाला सुरवात झाली. दहा ते पंधरा मिनिटे ढगांचा गडगडाट करीत आणि वादळी वार्यासह जोरदार पाऊस बरसला. रस्त्यांवर पाणी वाहत होते. परिणामी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी गैरसोय झाली. काही भागात झाडपटीच्या घटना घडल्या. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यासह घाट विभागात पुढील चार दिवस हवामान कोरडे, तर दुपारी ढगाळ वातावरण राहील.
Related
Articles
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आज करिअर मेळावा
07 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
07 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आज करिअर मेळावा
07 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
07 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आज करिअर मेळावा
07 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
07 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आज करिअर मेळावा
07 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
07 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?