E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
Wrutuja pandharpure
13 May 2025
नवी दिल्ली
: भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली होती. स्पर्धेतील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्यासाठी बीसीसीआयने नवे वेळापत्रक सहभागी १० फ्रँचायझी संघांना पाठवले असून लवकरच ही स्पर्धा पुन्हा सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यावर बीसीसीआय अधिकृतरित्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करणार असल्याचेही बोलले जाते. एका बाजूला आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु असताना दुसर्या बाजूला मिचेल स्टार्कसह अन्य काही स्टार परदेशी खेळाडू पुन्हा आपल्या फ्रँचायझी संघाला जॉईन होणार नाहीत, अशी चर्चा रंगू लागली आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बहुतांश परदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्याला पसंती दिलीये. १६ किंवा १७ मे पासून स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना आपल्या खेळाडूंना एकत्रित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पण मायदेशी परतलेले काही परदेशी खेळाडू पुन्हा या स्पर्धेसाठी भारतात परतणार नसल्याची चर्चा आहे. यामागचे कारण हे आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धाही आहे.
पुन्हा स्पर्धेसाठी भारतात न परतणार्या खेळाडूंच्या यादीत मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांची नावे सर्वात आघाडीवर आहेत. हेजलवूड हा दुखापतीमुळे पुन्हा आरसीबीच्या संघात सामील होणे मुश्किल असल्याचे बोलले जाते. स्टार्कही उर्वरित आयपीएल सामन्यासाठी परतणार नसल्याची माहिती त्याच्या मॅनेजरनं दिली होती.
Related
Articles
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल