E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
युद्धबंदीनंतरही हरयानात ‘ब्लॅकआऊट’
Samruddhi Dhayagude
12 May 2025
चंडीगढ : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे शनिवारी रात्री हरयानाच्या सिरसा आणि हिसार जिल्ह्यात ब्लॅकआउट करण्यात आला. त्याच वेळी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अंबालामधील नागरिकांनाही अलर्ट केले होते. दरम्यान, फरीदाबादचे डीसी विक्रम सिंह यांनी अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, बहुतेक जिल्ह्यांमधील प्रशासनाने निर्बंध हटवले आहेत.
पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता जम्मूमधील राजौरीच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. आरएस पुरा सेक्टर, कनाचकमधील लालयाल, मधमधील गोल पाटण, पूंछ, नौशेरा, सांबा आणि उधमपूर येथेही स्फोटाचे आवाज ऐकू आले. श्रीनगरमध्ये रात्री ८.३० च्या सुमारास एकामागून एक अनेक स्फोट झाले. जम्मूमध्ये ड्रोन दिसले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पंजाब आणि हरयानाच्या सीमावर्ती भागातील प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआउटचे आदेश दिले होते.
सिरसामध्ये कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली. विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान, हरयानामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी १.१० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हा उपायुक्तांना त्यांच्या जिल्ह्यात जलद आणि प्रभावी कारवाई सुनिश्चित करण्यासाठी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि महसूल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वित्तीय आयुक्त डॉ. सुमिता मिश्रा यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच रक्कम काढावी असे निर्देश दिले.
दोन पाकिस्तानी हेरांना अटक
भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकार्याला पाठवणार्या दोन हेरांना पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी अटक केली आहे. या हेरांना ऑनलाइन पैसे दिले जात होते. पैशाच्या बदल्यात ते भारतीय सैन्याच्या कारवायांची माहिती पाकिस्तानला पाठवत असे. मालेरकोटला पोलिसांना यासंदबर्भात माहिती मिळताच दोघांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. अधिक तपास सुरू आहे.
Related
Articles
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी