E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
अर्थमंत्र्यांचे ATM, UPI आणि Cash संदर्भात महत्वाचे निर्देश
Samruddhi Dhayagude
10 May 2025
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी बँकिंग आणि विमा क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांसोबत आणि वित्तीय क्षेत्राच्या नियामकांशी बैठक घेतली. अर्थमंत्र्यांनी सायबर सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याचे आणि डेटा सेंटर्सचे नियमितपणे ऑडिट करण्याचे निर्देश दिले जेणेकरून सर्व डिजिटल आणि कोअर बँकिंग पायाभूत सुविधांचे फायरवॉल पूर्णपणे सुनिश्चित होईल.
याशिवाय अर्थमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या सायबर क्रियाकल्प आणि उल्लंघनाला प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवण्यास सांगितले. बँका आणि विमा कंपन्यांव्यतिरिक्त वित्तीय सेवा विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), IRDAI आणि NPCI यांचे वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते.
भारत-पाकिस्तान तणावात अर्थमंत्र्यांचे निर्देश
सीतारमन यांनी शुक्रवारी, ९ मे रोजी बँकांना सतर्क राहण्यास आणि ग्राहकांना सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यास सांगितले. देशवासियांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सर्व पावले उचलावी, असे त्यांनी निर्देशही दिले. सायबर सुरक्षा तयारी बाबत बँका आणि विमा कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी आव्हानात्मक काळात आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला.
सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन प्रोटोकॉलवर भर
बँकिंग सेवा - बँक शाखा आणि डिजिटल बँका - कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि अडचणींशिवाय सुरू राहिल्या पाहिजेत. तसेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी बँकांनी आपत्कालीन प्रोटोकॉल अपग्रेड करावे आणि त्यांची चाचणी घेण्याचे आदेशही अर्थमंत्र्यांनी या बैठकीत दिले. त्याचवेळी, सीमावर्ती भागातील शाखांमध्ये काम करणाऱ्या बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी दिले.
पुरेसा कॅश उपलब्ध करण्याचे आदेश
सामान्य नागरिक आणि व्यवसायांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, याची खात्री करण्याचे बँकांना सांगितले. ATM मध्ये पुरेशी रोकड, बिनदिक्कत UPI आणि इंटरनेट बँकिंग सेवा व इतर आवश्यक बँकिंग सुविधांची उपलब्धता प्रत्येकाची प्राथमिकता असली पाहिजे, असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.
Related
Articles
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव