आगरतळा : बांगलादेश सीमेपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरतळा विमानतळाला सुरक्षा देण्याची विनंती विमानतळ अधिकार्यांनी बीएसएफकडे केली. विमानतळाचे संचालक के. सी. मीणा म्हणाले, या विमानतळावर दररोज चार हजार प्रवासी ये-जा करतात. विमानतळावरील सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्व संबंधितांसोबत बैठक घेतली. अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याची विनंती पोलिस अधिकार्यांना करण्यात आली.
Fans
Followers