E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षा-सज्जतेचा आढावा
Samruddhi Dhayagude
10 May 2025
सर्व वरिष्ठ अधिकार्यांच्या सुट्ट्या रद्द; जिल्हा स्तरावर वॉर रुम उभारणार
मुंबई, (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यातील महत्वाच्या विभागातील विशेषत: आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन मधील सर्व वरिष्ठ अधिकार्यांच्या सुट्टया रद्द करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. सोबतच जिल्हास्तरावर वॉररूम स्थापन करण्यात येणार असून देशद्रोहींना शोधून काढण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा स्तरावर वॉररूम
प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा असे निर्देश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा. ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
कोंबिंग ऑपरेशन राबवणार
प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा. पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा. सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या सोबतच नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ब्लॅकआउटबाबत जागरूकता
एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
वाचक लिहितात
28 May 2025
वकिलांनी बोलताना भान राखावे
31 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
वाचक लिहितात
28 May 2025
वकिलांनी बोलताना भान राखावे
31 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
वाचक लिहितात
28 May 2025
वकिलांनी बोलताना भान राखावे
31 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
वाचक लिहितात
28 May 2025
वकिलांनी बोलताना भान राखावे
31 May 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात