E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता
पुणे : मान्सून राज्यात स्थिरावला असला, तरी विदर्भ, मराठवाड्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस कायम आहे. विदर्भात पुढील आठवडाभर मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने रविवारी वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यानंतर मात्र मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात वादळी वार्यासह पाऊस पडणार असल्याने विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही ५ जूननंतर पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील घाट विभागातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. काही भागात ढगाळ वातावरणासह वारे वाहत आहेत.
मागील २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात काल ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३९.२ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. काल दिवसभर राज्यातील काही भागात वादळी वार्यासह जोराचा पाऊस पडला, तर काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर काही भागात पावसाची विश्रांती कायम आहे.
पुण्यात पावसाची हजेरी
मागील तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र रविवारी सकाळपासून शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. काल सकाळी ढगाळ वातावरणासह शहरातील बहुतांश भागात पाऊस पडला. त्यानंतर दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा सायंकाळी शहर आणि उपनगरात हलक्या सरी कोसळल्या. रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे उकाड्यात काही प्रमाणात घट झाली होती.
Related
Articles
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !