E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय कसोटी क्रिकेटमधील रोहितचे योगदान सर्वोत्तम : सचिन तेंडूलकर
Wrutuja pandharpure
09 May 2025
मुंबई
: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास ट्विट केले.
मला आजही आठवते की, २०१३ मध्ये मी माझ्या हाताने ईडन गार्डन्सवर तुला कसोटी क्रिकेटमध्ये कॅप देवून सामील करून घेतले होते. नंतर आपण दोघे वानखेडे स्टेडियमच्या बाल्कनीमध्ये उभे असल्याचाही क्षण माझ्या लक्षात आहे. तुझा कसोटी क्रिकेटमधील प्रवास खूपच उल्लेखनीय आहे. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत तू एक क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून भारतीय कसोटी क्रिकेटला खूप काही दिले. रोहितचे योगदान सर्वोत्तम आहे. वेल डन, रोहित. तुझ्या अप्रतिम कसोटी कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ’भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहीन’, असे रोहित शर्माने म्हटले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला, जो भारताने गमावला होता. रोहितने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४ हजार ३०१ धावा केल्या. तसेच २४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यातील १२ सामने जिंकले आणि नऊ सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. रोहितच्या निवृत्तीनंतर आता आगामी इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळणार हे स्पष्ट झाले आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.
Related
Articles
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
बंगळुरुच्या संघाने चषक जिंकावा : अनुष्का शर्मा
31 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस उलटली
27 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
बंगळुरुच्या संघाने चषक जिंकावा : अनुष्का शर्मा
31 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस उलटली
27 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
बंगळुरुच्या संघाने चषक जिंकावा : अनुष्का शर्मा
31 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस उलटली
27 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
बंगळुरुच्या संघाने चषक जिंकावा : अनुष्का शर्मा
31 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस उलटली
27 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट