कामगारांना घेऊन जाणारी मालमोटार उलटली, १७ जण जखमी   

ओतूर, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मांडवे येथून शेतमजुरांना बनकरफाटा येथे घेऊन निघालेली मालमोटार तेथील पुलाजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात १७ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान अपघाताची माहिती माहिती मिळताच तेथील युवकांसह ग्रामस्थांनी जखमींना रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन ते तीन जणांना अधिकचा मार लागला असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. तर काही कामगारांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घराकडे रवाना करण्यात आले आहे, असे स्थानिकांनी सांगितले.
 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी मांडवे तेथून  शेतमजुरांना घेऊन निघालेली मालमोटार तेथून काही अंतरावरच असलेल्या  खड्ड्यात पलटी झाली. आशा रामदास दाभाडे (वय ३८), सुधीर बाळू दाभाडे (वय १६), मनीषा किशोर दाभाडे (वय २२), कल्पना मोतीराम उंबरे (वय ३०), योगिता साहेबराव दाभाडे (वय ३३, झुंबर रोहिदास दाभाडे (वय ३५), चंद्रभागा मंगेश बुळे (वय ३५), साहिल भीमा दाभाडे (वय १६), करण बुधा दाभाडे (वय १६), सुंदराबाई मारुती दाभाडे (वय ६५), आदित्य बाळू दिघे (वय १७), अरुणा बुधा दाभाडे (वय ३५ ), नंदा भिमा दाभाडे (वय ३७), सविता अरुण सोनवणे (वय ३२), रंजना बाळू दाभाडे (वय ३८), निकिता भीमा दाभाडे (वय १९) सर्व रा. मांडवे (ता. जुन्नर) जि. पुणे हे जखमी झाले.

Related Articles