E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लखनौच्या खेळाडूंना लाखांचा दंड
Wrutuja pandharpure
29 May 2025
लखनौ
: आयपीएलच्या शेवटच्या लीग सामन्यात शतक केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप आनंदी दिसत होता. त्याचा उत्साहही शिगेला पोहोचला होता, पण या सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. इतकेच नव्हे तर सामन्यानंतर त्याला दंडदेखील भरावा लागला. लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हा या हंगामातील तिसरा गुन्हा ठरला. ५ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन सामन्यांमध्येही पंतला षटकांची गती कमी राखल्याने दंड भरावा लागला होता. ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पंतला तिसर्या चुकीसाठी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच, इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना वैयक्तिकरित्या १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के (जे कमी असेल ते) दंड ठोठावण्यात आला आहे.ऋषभ पंतचा हा तिसरा गुन्हा होता. पण असे असूनही त्याला निलंबित केले जाणार नाही. तिसर्या दंडानंतर एक सामन्याच्या बंदीचा नियम होता. आयपीएलमध्ये नियमात सुधारणा करण्यात आली. पण गेल्या वर्षीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. त्यामुळे ती शिक्षा दिली गेली. त्यानंतर नियमातील बदल लागू केले गेले. दरम्यान, सामन्यात पंतने ६१ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या, ज्यामुळे लखनौने ३ बाद २२७ धावा केल्या. परंतु विराट कोहलीच्या ५४ आणि जितेश शर्माच्या नाबाद ८५ धावांच्या जोरावर बंगळुरुने सामना ६ बळीने जिंकला.
Related
Articles
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !