कोंढव्यातील तीन पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले   

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना तत्काळ भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच, पुण्यातील तीन पाकिस्तानी नागरिकांना पुणे पोलिसांनी परत पाठवले.कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेले हे तीघेही ’शॉर्ट टर्म व्हिसा’वर भारतात आले होते. तिघेही पुण्यात आपापल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होते.
 
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या बैठकीत सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई करत त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशासनाकडून यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आलेला नाही, मात्र ही कारवाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. ही घटना भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सद्यस्थितीतील तणाव आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles