पुण्याचा पारा ४० अंशावर कायम   

पुणे : यंदाच्या एप्रिलमध्ये तपमानाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. शिवाजीनगर येथे १३ दिवस ४० अंश कमाल तपमान राहिल्याची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांत २०१६ मध्ये ११ दिवस, २०१९ मध्ये १२ दिवस तपमान ४० अंश कमाल तपमानाची नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तपमान ४० अंशापेक्षा अधिक राहिले आहे. 
 
तपमानाचा पारा यंदा एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच वाढला होता. कमाल तपमानासह किमान तपमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. तसेच, शहरात तपमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे तपमानात वाढ होत राहिली आहे. हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील तपमानाचा आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे २०१६ मध्ये ११ दिवस, २०१९ मध्ये १२ दिवस तपमान ४० अंश होते. तर यंदा नवा विक्रम नोंदवला जाऊन गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक १३ दिवस तपमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले आहे. २०१५ मध्ये एक, २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये सहा, २०१८ मध्ये दोन, २०१९ मध्ये १२, २०२० मध्ये एक, २०२२ मध्ये सात, २०२३ मध्ये एक, २०२४ मध्ये सात दिवस तपमान ४० अंशपेक्षा अधिक नोंदवले गेले होते. 

Related Articles