व्हॉट्सऍप कट्टा   

‘स्पष्ट बोला पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही अन त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही...
जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे, 
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो...
 
सगळे सत्पुरूष जसे घडेल, तसे वर्णन करतात. केवळ द्रष्टे  ऋषी जसे बोलतात त्याप्रमाणेच नंतर घटना घडतात. द्रष्ट्या लोकांना पुढचे दिसते. ते बोलतात तसेच घडते.
 
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे !
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे! ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवे ते मिळणे म्हणजे ’यश’ आणि जे मिळाले आहे त्यात गोड मानून घेणे म्हणजे ’सुख’.
 
मास्तर  : कॉफी शॉप आणि वाईन शॉपमध्ये काय फरक आहे?
विद्यार्थी : सोपे आहे सर! प्रेमाची सुरुवात कॉफीशॉप मध्ये होते आणि शेवट वाइन शॉपमध्ये!

Related Articles