अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साडेसहा हजार गाड्यांची खरेदी   

पुणे : साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तांवर दर वषीर्र् मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. यंदाही नागरिकांनी विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी केली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीत घट झाली आहे. यावेळी ६ हजार ७१० वाहनांची खरेदी झाल्यांची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. मागील वर्षी ७ हजार १९७ वाहनांची खरेदी झाली होती. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली. मागील वर्षीपेक्षा यंदा दुचाकी वगळता अन्य वाहन खरेदी वाढली असली तरी ई-वाहन खरेदीचा वेग मंदावला आहे.
 
दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तांवर वाहने घरी नेता यावीत, यासाठी नागरिक आधिच वाहन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून ठेवतात. शो रूम आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रक्रियाही पूर्ण करून ठेवली जाते. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच काही पुणेकरांनी वाहने घरी नेली. तर काहींनी अक्षय तृतीयेच्या दिवशी वाहनांचे पूजन करून वाहने घरी नेली. दरम्यान, यंदा गुढीपाडव्याला ई-वाहन खरेदीची संख्या ज्याप्रमाणे घटली त्याचप्रमाणे आत्ताही अक्षय्यतृतीयाला ई-वाहन खरेदीत मोठी घट झाली आहे. तर इंधन वाहनांमध्येही घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
 
गतवर्षी ७ हजार १९१ वाहनांची खरेदी झाली होती. तर यंदा ६ हजार ७१० वाहनांची खरेदी झाली असून, एकूण खरेदीच्या तुलनेत सर्वाधिक दुचाकी खरेदी असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५७७ ने दुचाकी खरेदीचा वेग मंदावला. तसेच अन्य वाहनांची खरेदीही घटली असून, चारचाकी, ऑटोरिक्षा, बस, गुड्स, टुरीस्ट टॅक्सी खरेदीमध्ये यंदा वाढ झाल्याचे दिसून येते.
 
 नवीन वाहन खरेदी
 
वाहनांचे प्रकार          एप्रिल २०२५           मे २०२४
दुचाकी                ४ हजार १७७        ४ हजार ७५२
चारचाकी                १ हजार ६८०         १ हजार ५९३
ऑटो रिक्षा                   २२१                    २०८
बस                              ३६                     २९
गुड्स                          ३०१                     २७५
टुरीस्ट टॅक्सी                २०३                      ९५
अन्य वाहने                    ९२                    १३९
एकूण                         ६७१०                   ७१९७

Related Articles