जॅकी चेनला जीवनगौरव पुरस्कार   

लॉस एंजलीस : अभिनेता जॅकी चेनला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेऊन ७८ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सव -२०२५ मध्ये त्याला पुरस्कार दिला जाणार आहे. 
 
द फियरलेस हायना (१९७९), हू अ‍ॅम आय ? (१९८८) आणि पोलिस स्टोरी (१९८५) या सारख्या चित्रपटांत त्याने अभिनय करुन रसिरांची मने जिंकली होती. लोकार्नो चित्रपट महोत्सवात ९ ऑगस्ट रोजी त्याला पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा महोत्सवाच्या वेबसाइटवर करण्यात आली.महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक जिओना ए नाझारोे म्हणाले, जॅकीने हॉलिवूड चित्रपटांचे नियम पुन्हा लिहायला भाग पाडले. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, कथालेखक, वेशभूषाकार, गायक आणि क्रीडापटू आणि  चित्रपटात थरारक दृश्ये स्वत:च करणारा आशियातील तो एकमेव अभिनेता आहे. एवढे गुण असणार्‍या अभिनेत्याला जीवनगौरव दिला जाणे अभिमानाची बाब आहे. आशियातील चित्रपटसृष्टीवर त्याने आपल्या गुणाने छाप सोडली असून  कर्तृत्वाने हॉलिवूड चित्रपटांचे नियम नव्याने लिहायला भाग पाडले आहे. गेल्या वर्षी भारतीय अभिनेता शाहरुख खानला या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महोत्सव ६ ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित केला जात आहे.
 

Related Articles