कलमाडी यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष   

पुणे : काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी  यांना कॉमनवेल्थ गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. २०१० साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याने सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचे राजकीय अस्तित्व संपले. मात्र, तब्बल १५ वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला आहे. 
 
ईडीकडून न्यायालयामध्ये या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांकडून कलमाडी यांच्या घरासमोर मंगळवारी जल्लोष करण्यात आला. २०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होती. या कॉमनवेल्थमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षाने केला होता. यावरून सीबीआय आणि ईडी या संस्थांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली होती.
 
या प्रकरणात कॉमनवेल्थ गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भनोट, आणि इतर अधिकार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले होते.त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. काँगे्रसचे सचिन आडेकर यांच्या नेतृत्वाचा जल्लोष करण्यात आला.
 

Related Articles