चीनमध्ये रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू   

बीजिंग : चीनच्या लिओनिंग प्रांतातील लियाओयांग शहरात मंगळवारी दुपारी एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये रात्री १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. याचे कारण सध्या देण्यात आलेले नाही. मात्र, या घटनेच्या छायाचित्रांमध्ये रेस्टॉरंटच्या खिडक्यांमधून आगीच्या प्रचंड ज्वाळा निघताना दिसत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महिन्यात चीनमध्ये आगीची ही दुसरी मोठी घटना आहे.

Related Articles