व्हॉट्सऍप कट्टा   

सहवास कोणाचा?      
                                                               
दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व  कष्टपूर्ण आहे हे कळेल.
दहा मिनिटे मद्यपीसमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
दहा मिनिटे साधु संन्याशासमोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल.
दहा मिनिटे राजकारणी पुढार्‍यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.
दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.
दहा मिनिटे व्यापार्‍यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
सहवास कुणाचा हे खूप महत्त्वाचं!
-----------
७० वर्षांच्या एका वृद्ध महिलेनं न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. 
न्यायाधीश : तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..? 
महिला : जज साहेब, माझे पती माझ्यावर मानसिक अत्याचार करतात.. 
न्यायाधीश : म्हणजे नेमकं काय करतात..? 
महिला : म्हणजे त्यांना हवं तेव्हा मला हवं तितकं सुनावतात.. 
न्यायाधीश : मग तुम्ही पण त्यांना सुनवायचं ना... 
महिला : अहो, पण मी बोलायला गेले की ते कानातील मशीन काढून टाकतात.

Related Articles