E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मितीत भारत अव्वल
Wrutuja pandharpure
29 Apr 2025
वृत्तवेध
जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारत झपाट्याने उदयास येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील मूल्यवर्धन पूर्वी केवळ ३० टक्के होते; ते आता सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षापर्यंत ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, नवीन घटक धोरणांतर्गत सरकार मूल्यवर्धन १५-१६ टक्क्यांवरून ४०-५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात ७७ पट वाढली आहे, जे मेक इन इंडिया उपक्रमाचे मोठे यश दर्शवते.
पूर्ण-निर्मित एअर कंडिशनर (सीबीयू) आयात २०१९ मध्ये ३५ टक्के होती. २०२५ मध्ये ती फक्त पाच टक्क्यांवर आली. आता कॉम्प्रेसर, कॉपर ट्युब आणि अॅल्युमिनियम कॉइलसारखे प्रमुख घटकदेखील भारतात स्थानिक पातळीवर तयार केले जात आहेत. २०२४ मध्ये सुमारे ८५ लाख ‘रॅक’ कॉम्प्रेसर आयात करण्यात आले होते; परंतु पुढील दोन-तीन वर्षांमध्ये ते पूर्णपणे भारतात तयार केले जातील. ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली’ची (पीसीबीए) मागणी व्यवसाय आणि ग्राहक या दोन्ही क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. यात उच्च आयात शुल्काचाही वाटा आहे. ‘पीसीबीए’ची आयात २०१८ मध्ये ३० हजार कोटी रुपये होती. ती आता जवळपास शून्यावर आली आहे. २०१६ पूर्वी भारत उत्पादनापेक्षा जास्त आयात करायचा; आता मात्र परिस्थिती बदलली आहे. २०२४ मध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाने २४ टक्क्यांपेक्षा अधिक आयात केली आहे. २०१६ ते २०२५ दरम्यान वार्षिक वाढीचा दर २६ टक्क्यांहून अधिक आहे.
कुशल मनुष्यबळ, उत्तम पायाभूत सुविधा आणि कॉर्पोरेट कर दर १५ टक्के यांसारख्या सरकारी योजनांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. आज, भारतात विकले जाणारे ९९ टक्के मोबाईल फोन स्थानिक पातळीवर बनवले जातात. ते देशाच्या वाढत्या उत्पादनक्षमतेचा पुरावा आहेत.
Related
Articles
बाळगोपाळांंसाठी पुस्तक जत्रा
15 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
बाळगोपाळांंसाठी पुस्तक जत्रा
15 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
बाळगोपाळांंसाठी पुस्तक जत्रा
15 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
बाळगोपाळांंसाठी पुस्तक जत्रा
15 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
जातींची नोंद काय साधणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली