सूर्यकुमार यादवच्या आयपीएलमध्ये वेगवान 4000 धावा   

मुंबई : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने वानखेडेच्या मैदानात रविवारी रंगलेल्या लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गावसणी घातली. दमदार अर्धशतकासह त्याने आयपीएमध्ये  4,000 धावांचा मैलाचा पल्ला गाठला. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात कमी चेंडूत 4000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
 
सूर्यकुमार यादवने 2714 चेंडूत चार हजार धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम सेट केलाय. याआधी हा विक्रम लोकेश राहुलच्या नावे होता. केएल राहुलनं 2820 चेंडूंत 4000 धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. सर्वात कमी चेंडूत 4000 धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार तिसर्‍या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनी 2658 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता.
 
या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये 150 षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. सूर्यकुमार यादवने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर षटकार मारत आयपीएलमध्ये 150 वा षटकार आपल्या खात्यात जमा केले. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 चेंडूत 192.86 च्या स्ट्राइक रेटनं 54 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सिक्सर मारत अर्धशतक साजरे केल्यावर आवेश खानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
 
लखनौ विरुद्धच्या सामन्यात रायन रिकल्टन आणि रोहित शर्मानं संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहितनं मयंक यादवच्या गोलंदाजीवर दोन कडत षटकार मारले. पण 5 व्या चेंडूवर तो बाद झालाय 33 धावांवर मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर रायन रिकल्टनने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवली. त्याने 32 चेंडूत 58 धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सचा डजाव सावरला. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौविरुद्धची लढाई 200 पारची केली. 

Related Articles