नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने   

पहलगाममधील हत्याकांडाचा निषेध 

काठमांडू : भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नेपाळची राजधानी काठमांडू येथे शनिवारी करण्यात आला. पाकिस्तान दूतावासाबाहेर नागरिक तेेथे आले आणि त्यांनी निदर्शने केली. नागरिक युवा शक्ती नेपाळच्या वतीने काल मोर्चा काढण्यात आला. पहलगाममधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नेपाळी तरुण सुदीप न्यौपाने (वय २७) याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिक आणि तरुण संतापले आहेत. तरुणांनी इस्लामिक दहशतवाद ठेचा, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्या आणि हिंदूंची हत्या रोखा, असे फलक हाती धरले होते. दरम्यान, सुदीप न्यौपाने हा पश्चिम नेपाळमधील भुतावल शहराचा रहिवासी होता. लष्कर ए तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेसिस्टन्स फोसर्ंच्या (टीआरएफ) दहशतवाद्यांनी पहलगाम येथे नुकताच दहशतवादी हल्ला केला होता. त्यात २८ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात सुदीपची निर्मम हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यामुळे नेपाळमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीनेे देखील स्वतंत्र मोर्चा काढून काल हत्येचा निषेध केला.

Related Articles