भारताने पाकिस्तानसोबत असणारे सर्व संबंध तोडले पाहिजेत : सौरव गांगुली   

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असणारे सर्व संबंध तोडले पाहिजेत, अशी भूमिका भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे २०१२-१३ पासून भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. पण आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळते. आता ते ही नको, अशा आशयाचे वक्तव्य करत गांगुलीने  या स्पर्धेतही पाक विरुद्ध खेळू नये, असे म्हटले आहे. 
 
दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांबद्दलच्या प्रश्नांसंदर्भात सौरव गांगुलीने एएनआयला प्रतिक्रिया दिली. माजी क्रिकेटर म्हणाला की, भारताने पाकिस्तानशी असलेले सर्व क्रिकेट संबंध तोडले पाहिजेत. आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्येही त्यांच्याशी खेळू नये. दरवर्षी भारतीय भूमीवर काही ना काही घडताना दिसते. दहशतवाद खपवून घेतला जाऊ नये.  अशा आशयाच्या शब्दांत गांगुलीनं पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत,अशी भूमिका मांडली आहे.
निर्लज्ज पाकिस्तान, दहशतवाद्यांना ’स्वातंत्र्य सैनिक’ म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
 
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर निशाणा साधल्याची घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी घडली. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. २० हून अधिक पर्यटक जखमी झाले. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तानवर राग व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्रिकेट संबंधाला थारा मिळू नये, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

Related Articles