विराट कोहलीने हात जोडून दिनेश कार्तिकला दिला नकार   

बंगळुरु : विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंनी सजलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि १२ गुण मिळवले आहेत. या हंगामात विराट कोहलीची बॅटही चांगली तळपली आहे. पण यादरम्यान संघात अशी एक घटना घडली की आरसीबीमध्ये फूट पडून झाले दोन गट झाल्याचे म्हटले जात आहे. आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असताना ही घटना घडली.
 
डावाच्या १३ व्या षटकात विराट कोहली आरसीबी डगआउटजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान दिनेश कार्तिक विराट कोहलीकडे आला आणि त्याला सांगू लागला. या संपूर्ण घटनेकडे पाहून असे वाटत होते की कार्तिक विराट कोहलीला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यानंतर जे घडले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरं तर, कार्तिकचे म्हणणे ऐकल्यानंतर, विराटने थेट हात जोडले. यानंतर असे म्हटले जाऊ लागले की दोघांमध्ये काही मतभेद सुरू आहे. पण, असे काहीही समोर आलेले नाही.
 
विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिनेश कार्तिकनेही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. सामन्यानंतर कार्तिकने विराट कोहलीचे खूप कौतुक केले. कार्तिक म्हणाला, ’तो १८ वर्षांपासून इथे खेळत आहे. फक्त खेळच नाही तर त्यात सातत्य देखील राहिले आहे. त्याला सामन्यातील परिस्थिती चांगली समजते. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे.
 
राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असताना संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी कार्तिकला काही संदेश दिला. कार्तिकने कोहलीला सांगितले. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर, कोहलीने हात जोडले आणि पुन्हा क्षेत्ररक्षणाला सुरुवात केली. अशा परिस्थितीत, दोघांमध्ये काय घडले याबद्दल संपूर्ण प्रकरण समोर आलेले नाही, परंतु हे स्पष्ट आहे की आरसीबीमध्ये कोणताही दुरावा नाही. आणि फूट पडून दोन गट झाले नाहीत. कार्तिक या फ्रँचायझीसाठी बराच काळ खेळला आहे आणि तो संघाच्या सहाय्यक कर्मचार्‍यांचा सदस्य आहे. तसेच, विराट कोहलीसोबत त्याचे संबंध खूप चांगले आहेत.

Related Articles