पहलगाम हल्ल्याच्या वृत्तावरून अमेरिकेने न्यूयॉर्क टाइम्सला फटकारले   

वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे; पण अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने हल्लेखोरांचे वर्णन केवळ अतिरेकी आणि बंदूकधारी असे केले होते. अमेरिकन सरकारने या वृत्तातील न्यूयॉर्क टाइम्सची चूक दुरूस्त करून त्यांना फटकारले. 
 
रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील हाऊस फॉरेन अफेअर्स समितीने  समाजमाध्यमावर न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताचे कात्रण पोस्ट केले आहे. त्यावर लिहिले आहे की, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २४ पर्यटकांची हत्या केली. यावर समितीने वृत्तातील ’मिलीटंट’ हा शब्द हटवला असून त्याजागी दहशतवादी असे लिहिले आहे. यासोबतच न्यूयॉर्क टाइम्स, आम्ही तुमचे हेडिंग दुरुस्त केले आहे,  हा स्पष्टपणे दहशतवादी हल्ला होता. भारत असो की इस्रायल, जेव्हा जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स वास्तवापासून खूप दूर असतो, असेही समितीने त्यामध्ये म्हटले आहे. 
 

Related Articles