E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
Wrutuja pandharpure
08 May 2025
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी जगाला दिली. त्यांच्याबद्दल जनतेला औत्सुक्य निर्माण झाले आहे. सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. १९८१ मध्ये वडोदरा येथे त्यांचा जन्म झाला. बायो-केमिस्ट्री या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. १९९९ मध्ये चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून सोफिया यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला. बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स-१८ मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या १७ देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. सोफिया कुरेशी यांनी २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. सोफिया यांचे आजोबा सैन्यात होते आणि त्यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे देखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमधील लष्करी अधिकारी आहेत. सोफीया या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर वैमानिक आहेत.
सोफियाने जे देशासाठी केले, त्याचा सार्थ अभिमान : हलिमा
माझ्या मुलीने आपल्या देशासाठी जे केले आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. याचप्रकारे तिने पुढे जावे, तसेच इतरांनी आपल्या मुलींना शिकवावे, समृद्ध करावे. त्यांना चांगले शिक्षण द्या जेणेकरुन त्या माझ्या मुलीप्रमाणे सैन्य दलात अधिकारी होतील आणि देशासाठी काहीतरी करु शकतील. प्रत्येक घरातली एक मुलगी आणि एक मुलगा सैन्यात गेला पाहिजे असे मला वाटते. हवाई हल्ल्याच्या आधी सोफिया फक्त इतकेच म्हणाली होती, आमच्यासाठी दुवा कर. पुढे काय होणार? ते आम्हालाही माहीत नव्हते, असे सोफिया कुरेशी यांची आई हलिमा कुरेशी यांनी सांगितले.
व्योमिका सिंह
भारतीय वायू सेनेतील विंग कमांडर व्योमिका सिंह या ऑपरेशन सिंदूरची प्रसारमाध्यमांना माहिती देणार्या दुसर्या अधिकारी आहेत. व्योमिका या भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर वैमानिक आहेत. त्यांच्या नावाचा अर्थ ’आकाशाशी जोडणारा’ असा होतो आणि या नावाने त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा दिली. व्योमिका सिंह, नॅशनल कॅडेट कोअर म्हणजे एनसीसीमध्ये होत्या. त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. २०१९ मध्ये त्यांना भारतीय वायुदलात फ्लाईंग ब्रँचमध्ये वैमानिक म्हणून कमिशन मिळाले होते.
Related
Articles
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात